You are currently viewing हरभरा पिकाला कोळपणी किती महत्त्वाची ??
हरभरा कोळपणी

हरभरा पिकाला कोळपणी किती महत्त्वाची ??

हरभरा पिकांतील कोळपणी ही अत्यंत महत्त्वाची असते. शेतामध्ये पिकासोबत तणांचीही वाढ होत असते.सुरूवातीच्या काळात पिकांची वाढ हे खुप हळूवार असते.पण तण माञ जलद गतीने वाढत असते. जर तणाचे प्रमाण पिक लहान असताना वाढले तर पिकांवर परिणाम दिसून येतात आणि उत्पादनात घट येते त्यामुळे पिक लहान असताना खुरपणी करणे परवडणारे नाही, खर्चीक आहे.
हरभरा पिक खुप नाजूक असते त्यामुळे हरभरा पिकासाठी प्रभावी तणनाशक सुध्दा नाही. हल्ली बाजारात जे तणनाशक आले आहेत त्या बद्दल शेतकरी व विक्रेता यांच्यात संभ्रम आहे. त्यांच्या कार्य करण्याच्या पदधतीमध्ये आणि त्यांच्या वापराने होणाऱ्या दुषपरिणामांची माहिती उपलब्ध नाही.

हरभरा पिकासाठी कोळपणी हि महत्त्वाचे तण नियंत्रक ??

शेतामध्ये पिकासोबतच तणांचीही वाढ होत असते. ही तणे पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश याबाबतीत पिकांशी स्पर्धा करतात. पीक उगवून आल्यावर त्यात ठरावीक दिवसानंतर कोळपणी केली जाते. त्याचा मुख्य उद्देश तण नष्ट करणे आणि वाया जाणारी ओल थोपवणे हा असतो. याशिवाय कोळपणीमध्ये माती हलवून ढिली केली जाते. त्यातून जमिनीच्या पृष्ठभागावर एक पोकळ थर तयार होतो, त्यामुळे उडून जाणारी ओल थोपवता येते. खरिप हंगाम किंवा रब्बी हंगामात तर कोळपणी अत्यंत महत्त्वाची ठरते.
ग्रामीण भागात “एक कोळपणी म्हणजे अर्धे पाणी ’’ अशी म्हण आहे. कोळपणी केली तर पाणी दिल्याप्रमाणेच फायदा होतो.

तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते. कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. तसेच दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते.

हरभरा पिकाला कधी आणि किती वेळा कोळपणी करावी ??

कोळपणी शक्यतो वापशावर करावी. कोळपणी मुळे जमिनीत हवा चांगली खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली होते. तसे बघता पेरणी झाल्याच्या २० ते २५ दिवसानंतर एकदा आणि ३० ते ४० दिवसानंतर एकदा अशी दोन वेळा कोळपणी केल्यास फायदेशीर आहे परंतु किमान एकदा तरी कोळपणी करावी.

https://khetikisaani.com/%e0%a4%9a%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b0%e0%a4%ac%e0%a5%80-%e0%a4%8b%e0%a4%a4%e0%a5%81-%e0%a4%95%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3/

हरभरा पिकाला कोळपणीच का करावी ??

  • कमीत कमी खर्चात व वेळेत तण निंयञण होते.
  • जमिनीत हवा खेळती राहते उत्पादनात वाढ होते.
  • जमिनीची सुपिकता वाढते.
  • सुक्ष्म जीवाणुच्या संख्येत वाढ होते.
  • मशागतीचा खर्च कमी होतो.
  • कीड, रोग यांच्यापासून बचाव करता येतो.
  • शेतातील बुरशीचा फैलाव कमी होतो मर रोगाला हरभरा बळी पडणार नाही.
  • हरभरा पिकास कोळपणी केल्यावर त्यांचा भर भसल्यावर पिकांची वाढ चांगली होते.
  • जमिनीतील ओल या कारणांनी कमी होते. जमिनीत साठलेली ओल, पिकांद्वारे वापरली जाते.

धन्यवाद !!

लेख संकलित आहे

संकलन
जितेंद्र पां राजपूत, शिरपूर
हर्षल राजपूत, शिरपूर, महाराष्ट्र

Leave a Reply