You are currently viewing वेस्ट डी कंपोझर ? चमत्कारिक औषधी
वेस्ट डी कंपोझर

वेस्ट डी कंपोझर ? चमत्कारिक औषधी

वेस्ट डी कंपोझर हे नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग, गाझियाबाद या संस्थेद्वारे संशोधित शेतीसाठी उपयुक्त बुरशी व जीवाणूंचे कल्चर (संवर्धित स्वरूप) आहे. एका विशिष्ट माध्यमात जतन केलेले हे जीवाणू प्लास्टिक बाटल्यांमधे ३ वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य अवस्थेत राहतात. यामधे पिकाच्या वाढीसाठी तसेच विविध अपायकारक बुरशी व विषाणूंपासून सुरक्षा प्रदान करणारे उपयुक्त सूक्ष्मजीव आहेत. जमीनिच्या सुपिकतेसाठी, पिकाच्या वाढीसाठी व रक्षणासाठी याचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करता येतो. संस्थेद्वारा पुरविलेल्या प्लास्टिक बाटल्यांमधे उपलब्ध ५० ग्रॅम कल्चर पासून २०० लिटर द्रावण तयार करता येते. हे एकच द्रावण पिकास पोषण व रोगप्रतिकारक म्हणून वापरता येते. द्रावण तयार करण्याची पद्धत अगदी सोपी व कमी खर्चिक आहे.
ज्या शेतकऱ्यांना मजुरांची समस्या, पैशांची कमतरता अथवा इतर सुविधे अभावी जनावरे पाळणे शक्य नाही व त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी जनावरांचे शेण व मूत्र उपलब्ध नाही अशा शेतकऱ्यांसाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे.

नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग गाजियाबाद (UP) द्वारा प्रसिद्ध केलेल्या “वेस्ट डी कंपोझर” च्या चार शास्त्रज्ञांनी (डॉ. कृष्ण चंद्र, डॉ. वी. प्रविण कुमार, डॉ. रश्मी सिंह व डॉ. पुजा कणोजीया) मिळुन या उत्पादनाची निर्मित केली आहे.

वेस्ट डी कंपोझर मध्ये नेमके काय आहे ??

यात खालील चार मुख्य प्रकारचे सूक्ष्म जीवाणू आहेत.
ICAR-IIFSR च्या अहवालानुसार यामध्ये त्या ४ जिवाणुचा कावुंट तीव्रता खालील प्रमाणे आढळते.

Cellulose Degrading Bacteria (१०.०×१०७)

याच्या नावातच याची ओळख आहे. Cellulose (सेल्युलोज) म्हणजे कुठल्याही सेंद्रीय पदार्थातील मुख्य घटक. याला degrade करणारे म्हणजेच सडवणारे किंवा कुजवणारे सूक्ष्म जीवाणू. म्हणजेच काष्टा पासुन किंवा टाकावू पदार्था पासून कार्बन विलग करणारा जिवाणू. हा जिवाणू औद्योगिक वापरात खुपच मोठ्या प्रमाणात सडवन्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
याच जिवाणू वरूनच या प्रोडक्टचे नाव ठरविण्यात आलें आहे. तेंव्हा सहाजीकच याच जिवाणूची तीव्रता (कावुंट) या कल्चर मध्ये सर्वात जास्त आहे.
त्यामुळे याचा वापर कीड नियंत्रणासाठी ही करता येते. वेस्ट डी कंपोझर मधिल याच जिवाणूच्या फवारणीने किडींची मेणयुक्त (wax) त्वचा रखरखीत करून त्यांचा उत्कृष्ट परीणाम सोबतच्या साधारण विषाणे (औषधी) मिळवणे सहज शक्य आहे.
परंतु, पिकास जमीनीतून ही बरेच काही हवे असते, ज्याचा पुरवठा जमीनीतील सेंद्रीय कर्बाच्या विघटनातून होत असतो. यासाठी जमीनीतील सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण (आच्छादन किंवा टाकावू पदार्थ) जमिनीत वाढवण्यासाठी प्रयत्न करणे तितकेच महत्वाचे आहे. अशा वेगवान विघटकाचा वापर करताना जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी विशेष श्रम घेणेही तितकेच आवश्यक आहे.

Xylan Degrading Bacteria (२.४ ×१०४)

आता जाणुन घेवुया Xylan (झायलान) म्हणजे काय?
सेंद्रीय पदार्थातील पेशींच्या आतील आवरणास Xylan असे शास्त्रीय नाव आहे. या आवरणाचे विघटन करणारे सूक्ष्म जीवाणू.
वरील दोन्ही प्रकारचे काम करणारे सूक्ष्मजीवाणू म्हणजे
Pseudomonas, Bacillus, Rhizobium हे आहेत. या मुळे नत्र स्थिरीकरणास चालना मिळते. आछादनातील बायाेमासचे वेगाने ‘डि-कंपोज करुन पिकास मुख्य अन्नद्रव्यांच्या व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा वेस्ट डी कंपोझर करते.

PSB (Phosphorus solubilizing Bacteria) (२.० ×१०७)

दाेन अथवा तिन कणांनी बनलेल्या फॉस्फाेरसचे विघटन करुन सिंगल सुपर फॉस्फेट मध्ये रुपांतरीत करुन मुळाना देते.

KSB (Potash solubilizing Bacteria) (८.० × १०४)

मातीतील पाेट्याश सुलभतेने घेण्यास मुळाना मदत करते. अशा प्रकारे मुख्य अन्नद्रव्यांचा व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा थेट पुरवठा करते. तसेच बुरशी नाशक व किटकनाशक म्हणुनही याचा वापर करु शकताे. या सर्व गुणा मुळेच वेस्ट वेस्ट डी कंपोझर शेतकर्‍यांसाठी वरदान ठरत आहे.

अवश्य पढे

वेस्ट डी कंपोझर बनविण्यासाठी लागणारे साहित्य

  • वेस्ट डी कंपोझर कल्चर
  • २ किलो गुळ
  • २०० लिटर क्षमतेचा प्लास्टिक ड्रम किंवा मातीचा रांजण (कोणत्याही धातूचा अजिबात नको)
  • २०० लिटर पाणी (विहिरीचे, बोअरचे अथवा नळाचे यापैकी कुठलेही चालेल)

वेस्ट डी कंपोझर कसे बनवावे ?

ड्रम मधे २०० लिटर पाणी टाकावे. त्यात वेस्ट डी कंपोझर बाटलीतील कल्चर व २ किलो गुळ टाकून लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. यानंतर हे द्रावण स्वच्छ कापड अथवा बारदानाने झाकावे. स्थानिय वातावरण व तापमाना नुसार हे द्रावण तयार होण्यास ५ ते ७ दिवसाचा अवधी जरूरी आहे. यादरम्यान दररोज दोनदा हे द्रावण लाकडी काठीने २ ते ५ मिनिट ढवळावे. द्रावण बनवताना ड्रम सावलीत किंवा उघड्यावर ठेवावे अशी कोणतीही अट नाही.
पहिल्या दिवशी द्रावणाचा रंग त्यातील गुळामुळे काहीसा तांबूस दिसेल. तीन दिवसानंतर हा रंग काहीसा दुधाळ दिसू लागेल. ५ व्या किंवा ७ व्या दिवशी द्रावणाचा रंग पूर्णपणे दुधाळ दिसू लागेल. याचा अर्थ कल्चरमधील जीवाणू व एंझाइम्स द्रावणात पूर्णपणे विकसीत झाले आहेत व द्रावण वापरण्यासाठी तयार आहे.

कसे वापरावे ?

जमीनीमधे तयार झालेले २०० लिटर द्रावण १ एकरास ठिबकद्वारे अथवा पाटपाण्याने द्यावे. यामुळे जमीनीत सूक्ष्मजीवाणू व गांडूळांची वाढ होऊन जमिन सुपिक व भुसभुशित बनते. जमीनीतील सेंद्रीय पदार्थांचे अतीशीघ्र विघटन होऊन त्यांचे अन्नद्रव्यात रूपांतर होते. ही अन्नद्रव्ये पिकाच्या मुळांना सहजी ग्रहण करता येतात. परीणामी पिकांची वाढ जोमाने होते.

फवारणीसाठी

पिकांवर फवारणीसाठी १ लिटर पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डी कंपोझर द्रावण मिसळून दर ८ ते १५ दिवसांनी फवारल्यास हानीकरक बुरशी व कीड यांचा उपद्रव होत नाही. या प्रमाणानुसार फवारणीच्या १५ लिटर क्षमतेच्या पंपात ४ ते ४.५ लिटर द्रावण मिसळावे. आपल्या परीसरात होणाऱ्या प्रादुर्भावाच्या तीव्रतेनुसार फवारणीचा काळ आपण ठरवावा.

बीज प्रक्रियेसाठी

१ लिटर पाण्यात ३०० मिली. या प्रमाणात वेस्ट डी कंपोझर द्रावण मिसळून पेरणी आधी बियाण्यांवर शिंपडावे व अर्धा तास सावलीत वाळवून पेरणी अथवा टोकण करावी. रोप लावणी अगोदर त्याची मुळे या द्रावणात बुडवून लागण करावी. यामुळे बियाण्याचे व मुळांचे जमीनीतील हानीकरक विषाणू व बुरशी पासून बचाव होतो.

शेणखत कुजवण्यासाठी कंपोस्ट बनविण्यासाठी

अंदाजे १ टन शेणखताच्या ढिगावर केवळ २० लिटर वेस्ट डी कंपोझर द्रावण शिंपडावे. एक आठवड्यानंतर हा ढिग पलटावा व त्यावर पुन: २० लिटर द्रावण शिंपडावे असे दर आठवड्याला करत ४० दिवसात उत्तम प्रतीचे कुजलेले शेणखत तयार होते ज्यामधे उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंची संख्या अधिक आहे. शेणाऐवजी आपल्याकडील जमा केलेला काडीकचरा किंवा धान्य मळणीनंतर निघालेला कोणत्याही पिकाचा भुसा यावरही अशीच प्रक्रिया करून उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार करता येते.

महत्वाचे

एकदा तयार झालेया या द्रावणापासून आपण पुन: पुन: नवीन द्रावण तयार करू शकता. यासाठी तयार द्रावणातून पहील्यांदा २० लिटर द्रावण शिल्लक ठेवून त्यात २ किलो गुळ व १८० लिटर पाणी टाकून वरील प्रमाणेच कृती करावी. ५ ते ७ दिवसात तेवढ्याच उपयुक्ततेचे द्रावण तयार होईल. किंवा तयार झालेल्या द्रावणातून नवीन २०० लिटर क्षमतेच्या ५ ड्रम मधे प्रत्येकी २० लिटर द्रावण, २ किलो गुळ व १८० लिटर पाणी टाकून पुढील ५ ते ७ दिवसात आपणास १००० लिटर द्रावण तयार होऊ शकते.

धन्यवाद…!

लेख संकलित आहे

संकलन
जितेंद्र पा. राजपूत, शिरपूर
हर्षल राजपूत, शिरपूर

This Post Has 2 Comments

Leave a Reply