You are currently viewing झाडाची मुळे व त्यांची कार्य ??
झाडांची मुळे

झाडाची मुळे व त्यांची कार्य ??

पिकाच्या मुळे ह्या मुद्दाम ठरवुन काही अन्नद्रव्यांच्या साठ्यापर्यंत वाढीत नाहीत. जमिनीत असलेली अन्नद्रव्ये मुळांच्या जवळ असली हवीत. ह्या अन्नद्रव्यांचे मुळांमध्ये वहन किंवा प्रवेश खालिल पैकी एका किंवा अनेक मार्गांनी होत असतो.

मुळांमध्ये शिरणे (रुट इंटरसेप्शन)

मुळा वाढीत असतांना त्या कधी कधी ज्या ठीकाणी अन्नद्रव्ये आहेत त्या साठ्याच्या ठिकाणी जाउन पोहचतात. अशा वेळेस तेथिल अन्नद्रव्ये मुळ्यांमध्ये शिरतात. हा प्रकार असा आहे जसा शि-याच्या कढईत चमचा टाकणे.

पाण्याच्या वहना द्वारे (मास फ्लो)

जमिनीत असलेली अन्नद्रव्ये पाण्यात विरघळतात आणि पिक जेव्हा पाणी शोषुन घेते त्याद्वारे ती मुळांमध्ये शिरतात.

डिफ्युजन

स्फुरद व पालाश सारखी अन्नद्रव्ये मातीच्या सुक्ष्म कणांवर पक्की आर्कषली जातात त्यामुळे ती काही प्रमाणातच जमिनीतील पाण्यात असतात. ज्यावेळेस मुळे त्यांच्या जवळील मातीच्या कणांतुन अन्नद्रव्ये शोषुन घेतात त्या वेळेस त्या मातीच्या कणांवरील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते व ते अन्नद्रव्य ते शेजारील कणीवरुन मिळवतात असे मिळवलेले अन्नद्रव्य पुन्हा मुळांद्वारे शोषले जाते.

अशा प्रकारे डिफ्युजन क्रियेद्वारे पिकाच्या मुळ्या अन्नद्रव्य ग्रहण करतात…

झाडाची मुळे व मुळ्यांची कार्य ??

  • मुळे जमिनीतून पाणी व अन्नघटक शोषून झाडाला पुरवतात.
  • झाडाला मातीमध्ये ठामपणे उभे राहण्यात मदत करतात.
  • अन्न आणि अन्नघटक साठवून ठेवतात.
  • काही प्रजातींमध्ये नवीन रोपांची निर्मिती मुळांमधून पण होते.

मुळांद्वारे शोषून घेतल्या जाणाऱ्या पाण्यात जर अन्नद्रव्ये विरघळलेली असतील तर ती पण झाडाच्या खोडातून पानांपर्यंत पोहोचतात आणि झाडाच्या वाढीला मदत होते.
इथे हा मुद्दा समजून घेणे फार महत्त्वाचे आहे की मुळे पाण्यात विरघळलेली अन्नद्रव्ये शोषून घेतात. म्हणून जेव्हा आपण झाडांना खत घालतो तेव्हा त्यांना पाणी देणेही गरजेचे असते. पाणी दिल्यामुळे खतातील अन्नद्रव्ये पाण्यात मिसळतात आणि झाडांची मुळे ती अन्नद्रव्ये शोषून घेऊ शकतात. मेथी तसेच काही कडधान्ये पिकांच्या मुळांवर सूक्ष्मजीवांच्या गाठी असतात. यात असलेले सूक्ष्मजीव हवेतील नत्र जमिनीत बंदिस्त करतात. असा नत्र मुळांद्वारे झाडाला मिळून त्याची वाढ चांगली होते. कोणत्याही झाडाच्या शाकीय वाढीसाठी नत्राची गरज असते.

झाडाचे खोड

  • मुळांद्वारे शोषलेले पाणी हे खोडामधून पानांपर्यंत पोहोचविले जाते. त्याचबरोबर हे पाणी वापरून पानांनी तयार केलेले अन्न याच खोडामधून मुळांपर्यंत पोहोचविले जाते. पाणी व अन्न याच्या खालून वर व वरून खाली अशा वहनासाठी नलिका असतात. असे हे वहनाचे कार्य झाडाच्या शरीरात सतत चालू असते.
  • या वहनाव्यतिरिक्त खोड हे झाडांना आधार देण्याचे महत्त्वाचे कार्य करते. खोडामुळेच झाडे सरळ उभी राहू शकतात तसेच पाने, फुले व फळे हे एका ठरावीक उंचीवर वाढू शकतात.
  • खोडामुळे झाडांना एक ठरावीक आकार प्राप्त होतो. हा आकार झाडाला त्याची वेगळी ओळख पण देतो.
  • वनस्पतीने तयार केलेल्या अन्नाचा साठा खोडात केला जातो.
  • नवीन पेशींची निर्मिती पण खोडात होत असते.

वेलींच्या खोडांची रचना वेगळी असल्यामुळे वेलींना आधार द्यावा लागतो. काही ठिकाणी वेली खिडकीच्या ग्रीलच्या आधाराने पण वाढवलेल्या बघायला मिळतात. घरातील कुंडय़ांमध्ये जेव्हा वेली लावल्या जातात तेव्हा त्यांना मॉसपोलच्या साहाय्याने आधार देऊन वाढवाव्या लागतात. (मॉसपोल- एका काठीला किंवा पाइपला वरून मॉस-शेवाळ- बांधून मॉसपोल तयार केले जातात. वेलींना आधार म्हणून यांचा उपयोग होतो. त्याचबरोबर मॉस हे ओलावा धरून ठेवत असल्यामुळे झाडांना टवटवीतपणा मिळतो.)

झाडाची पाने

पाने ही झाडांचे अन्न तयार करण्याचा कारखानाच आहे असे म्हणता येईल. पानांमधील हरितद्रव्याच्या साहाय्याने झाडांचे अन्न तयार होते. या क्रियेला वनस्पतिशास्त्राच्या भाषेत प्रकाशसंश्लेषण (photosynthesis) असे म्हणतात. प्रत्येक पानावर सूक्ष्म अशी छिद्रे असतात. या छिद्रांमधून जास्त असलेले पाणी बाहेर टाकले जाते. या क्रियेला गटेशन (guttation) म्हणतात. झाडांच्या पानांमधून सतत वाफेच्या रूपात पाणी बाहेर पडत असतं. या क्रियेला ट्रान्स्पिरेशन (transpiration) असे म्हणतात. या क्रियेमुळेच झाडे असलेल्या परिसरात एक प्रकारचा गारवा जाणवतो.

पिक उत्पादनवाढीमध्ये मुळीचे महत्व

वनस्पतींना किंवा पिकांना एकुण दोन प्रकारच्या मुळ्या असतात.

  • पांढरी मुळी
  • काळी किंवा लालसर रंगाची मुळी
  • मुकुटमुळी

पांढरी मुळी

पांढरी मुळी ही वनस्पतीचा मुख्य भाग आहे.या मुळीस काही ठिकाणी केशमुळ देखिल म्हणतात. ह्या मुळीचा शेंड्याकडील बराच भाग हा पांढरा असतो. म्हणून ह्या मुळीला पांढरी मुळी म्हणतात. ह्या मुळीचे मुख्य कार्य म्हणजे जमिनितील अन्न व पाणी शोषणे होय. म्हणून या मुळीस वनस्पतीचे खाणारे तोंड देखिल म्हणतात. ज्या पिकामध्ये पांढरया मुळांची संख्या जास्त म्हणजे खाणारी तोंडे जेवढी जास्त तेवढ़े त्या पिकांची
उत्पादन जास्त व पिके सुदृढ असतात. अशा पीकामध्ये रोग प्रतिकारशक्ती जास्त असते. वनस्पतींच्या पांढरी मुळीच्या तोंडाजवळ जेवढे अन्न किंवा खत येईल तेवढेच खत किंवा अन्न सदर मुळी शोषण करीत असते. दूरचे अन्न किंवा खत सदर मुळ शोषून घेऊ शकत नाही म्हणून जेवढया पिकास पांढरया मुळ्या जास्त तेवढे पिक जास्त अन्न शोषण करीत असते व तेवढे पिक सशक्त व पिकांचे उत्पन्न जास्त असते.

काळी किंवा लालसर रंगाची मुळी

या काळ्या मुळीस काही ठिकाणी निबर किंवा कठिण मुळी म्हणतात. काळी मुळी ही पांढरया मुळीच्या आकाराच्या मानाने बरयाच मोठया असतात. वेगवगळ्या वनस्पतिमध्ये या मुळांचा रंग वेगवेगळा असतो. या मुळांचे मुख्ये काम पुढीलप्रमाणे असते.

पांढरया मुळीने शोषलेले अन्न हे वनस्पतीच्या किंवा पिकांच्या पानाकडे पाठवणे.

वनस्पतीला किंवा पिकांना मातीशी घट्ट धरून ठेवणे, पिकास किंवा वनस्पतीस आधार देण्याचे मुख्य कार्य या काळ्या मुळ्या करित असतात.

मुकुटमुळी

पिकामध्ये किंवा वनस्पतीमध्ये सुरुवातीस सुटणारया मुळांना जेटमुळ किंवा सोटमुळ म्हणतात. पिकामध्ये लागणीनंतर काही दिवसांनी फुटवे येतात व त्या फुटव्यांना मुळ्या सूटतात. अशा फुटव्यांच्या सूटलेल्या मुळ्यांना मुकुटमुळी म्हणतात.

पिकांची मुकुटमुळ ही जमिनितील अन्न किंवा खत व पाणी शोषूण त्या त्या फुटव्यांना उपलब्ध करून देतात. यामुळे प्रत्येक फुटवा हा एकसारखा वाढण्यास मदत होते. यामुळे आपल्याला सर्व फुटवे लाभतात व उत्पन्नामध्ये प्रचंड वाढ होते.

धन्यवाद…!

संकलन
जितेंद्र पां राजपूत, शिरपूर

हर्षल राजपूत , शिरपूर

Leave a Reply